Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्हा कबूल आहे का? सहकार्य कराल तर... कोर्टाचा प्रश्न, 'मला गुन्हा मान्य नाही'

गुन्हा कबूल आहे का? सहकार्य कराल तर... कोर्टाचा प्रश्न, 
'मला गुन्हा मान्य नाही'

ठाणे : खरा पंचनामा

राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का? सहकार्य केल्यास प्रकरण महिन्याभरात संपेल, असा प्रश्न कोर्टाने विचारल्यानंतर राज ठाकरेंनी 'मला गुन्हा मान्य नाही' असं स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच ठाणे कोर्टातील सुनावणी संपली.

प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपकाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात 'उत्तर सभा' झाली होती. या सभेत स्थानिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना सत्कारानंतर तलवार दिली. ही तलवार व्यासपीठावर ठाकरे यांनी म्यानातून बाहेर काढून हवेत उंचावली होती. या प्रकरणी ठाकरे यांच्यासह मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी आज, गुरुवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी ठाण्यात हजेरी लावली.

राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रार्थना स्थळांवरील अनधिकृत ध्वनिक्षेपकांच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. त्यामुळे मनसे आणि सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतन येथील चौकात जाहीर सभा घेतली. त्यांच्या भाषणाआधी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना तलवार भेट दिली. ही तलवार राज यांनी म्यानातून बाहेर काढत दाखवली. हीच बाब त्यांना भोवली आहे.

या प्रकरणी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिस ठाण्यात कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाण्यामध्ये आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.