Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मद्य तस्कर टोळीकडून गस्ती पथकावर हल्ला; ५ जण जखमी

मद्य तस्कर टोळीकडून गस्ती पथकावर हल्ला; ५ जण जखमी

धुळे : खरा पंचनामा

तालुक्यातील अनवरनाला परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी पथकावर संशयित मद्य तस्करांनी थरारक हल्ला चढविल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास घडली.

दहा ते बारा जणांच्या जमावाने काठ्या तसेच गोफनाच्या (गिलोरी) सहाय्याने दगडफेक करत उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात चौघे अधिकारी-कर्मचारी जखमी झाले असून, मद्यसदृश्य बाटल्यांनी भरलेल्या खोक्यांचे वाहन घेऊन हल्लेखोर पसार झाले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश धनवटे, दुय्यम निरीक्षक अमोल भडागे, सुरेश शिरसाळे आणि जवान दारासिंग पावरा हे या घटनेत जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात १० ते १२ अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध सरकारी कामात व्यत्यय आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत उत्पादन शुल्क विभागाचे जवान सुरेश लालचंद शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक शासकीय वाहनातून (क्र. एमएच ०१ डीओआय ५०८७) धुळे विभागात गस्त घालत होते. यावेळी बाळापूर (ता. धुळे) शिवारात फागणे-वडजाई रस्त्यावर संशयास्पद महिंद्र बोलेरो पिकअप वाहन (क्र. एमएच ४१ एयू ६२०७) उभे असल्याचे दिसून आले. नवीन इंदूर-मनमाड रेल्वे क्रॉसिंगजवळ (अनवर नाला परिसर) वाहनाची तपासणी केली असता त्यात निळ्या रंगाचे ड्रम, खाकी रंगाचे खोके तसेच मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तपासणी सुरू असतानाच अचानक दहा ते बारा जणांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला. काहींनी जवळून काठ्यांनी हल्ला केला, तर काहींनी गोफनाच्या सहाय्याने दुरून दगडफेक सुरू केली.

या हल्ल्यात निरीक्षक राजेश धनवटे यांच्या कपाळावर दगड लागून ते जखमी झाले. दुय्यम निरीक्षक अमोल भडागे यांच्या पाठीवर व उजव्या दंडावर, तर सुरेश शिरसाळे यांच्या पाठीवर दुखापत झाली. जवान दारासिंग पावरा यांच्या उजव्या पायावर दगड व काठीचे वार करण्यात आले. हल्ल्याचा फायदा घेत संशयित मद्य तस्करांनी बोलेरो पिकअप वाहन घेऊन घटनास्थळावरून धूम ठोकली. याप्रकारणी मोहाडी पोलीस ठाण्यात १० ते १२ हल्लेखोरांविरुद्ध शुक्रवार (दि. १९) रोजी रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत झाली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.