खोपोलीतील माजी नगरसेवकच्या हत्याकांडातील ९ आरोपी गजाआड; दोघे फरार
रायगड : खरा पंचनामा
खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेत आता मोठं वादळं आलं आहे. या घटनेशी संबंधित नऊ आरोपींना पकडण्यात रायगड पोलिसांना यश आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे (Mansi Kalokhe) यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्याला सोडून परत येताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. मंगेश काळोखे यांना भर दिवसा रस्त्यात अडवलं आणि खाली पाडलं. रस्त्यावर पडल्यानंतर दोन-तीन जणांनी काळोखेंना घेरले. त्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी दगड, तलवारी आणि कोयत्याचा वापर करून काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सुमारे २४ ते २७ वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की काळोखेंचा जागीच मृत्यू झाला.
काळोखेंच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर रायगड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत नऊ संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.