Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या नराधमास मरेपर्यत सश्रम कारावासाची शिक्षा व दंड

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या नराधमास मरेपर्यत सश्रम कारावासाची शिक्षा व दंड

सांगली : खरा पंचनामा

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस मरेपर्यंत सक्त मजुरी व एकूण दंड एक लाख दहा हजार आणी दंड भरला नाही तर साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. विटा येथील जिल्हा न्यायाधीश क्र. १ व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अॅड. आरती आनंद देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.

रमेश बाबुराव रणदिवे (वय ४०, रा. दिघंची, भिगेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. नाराधमाने दोन पिडीतेंवर अत्याचार केला त्यामध्ये एका पिडीतेला जबरदस्ती आपल्या घरापासून थोड्या अंतरावर नेवून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला व दुस-या मुलीचा विनयभंग केला व त्यामुळे आरोपी लाभा. द. वि. कलम ३५४ व ३७६ (२) (एफ), ३७६ (३) पोक्सो कायदया अंतर्गत कलम ६ नुसार दोषी धरण्यात आले. ऑकटोबर 2021 मध्ये पिडीतेची आई व बहीण हि शेतामध्ये कामाला गेलेली होती आरोपी हा पिडीतेला घेवून बोरे आणण्यासाठी घराजवळील शेतामध्ये घेवून गेला त्यावेळी त्याने तिच्यावर जबरदस्ती करुन बलात्कार केला व तु आईला सांगितलेस तर तुला जिवे मारीन अशी धमकी दिली व त्यानंतर तिला घरी आणून सोडले. त्यानंतर पिडीतेची आई दुपारी दीड वाजता घरी आली त्यानंतर पिडीताही जोरजोरात रडू लागली. त्यावेळी तिच्याकडे आईने चौकशी केली असता पिडीतेने आरोपीने केलेली सगळी घटना तिने सांगितली. त्यावेळी पिडीतेची दुसरी बहिणही तेथे हजर होती त्यावेळी तिने ही आपल्या आईला आरोपी दोन महिन्यापूर्वी घडलेली घटना व आरोपीने केलेली घटना सांगितली व तिने पुढे सांगितले की, आरोपी याने आटपाडी बाजारात जायचे आहे असे सांगून घेवून गेला जाताना एका कॅनॉलजवळ असलेल्या चिल्लारी मध्ये तिला घेवून गेला व तिच्या छातीवरुन हात फिरवून छाती दाबली व कोणाला सांगायचे नाही नाहीतर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. त्यामुळे मी कोणालाही सांगितले नाही असे तिने सांगितले. त्यानंतर पिडीतेची आई आपल्या दोन्ही मुलींना घेवून आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केला. या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला या घटनास्थळावरुन आरोपीने पिडीत मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचार करीत असताना वापरलेली पॅराशूट तेलाची बाटलीही जप्त करण्यात आली. त्याचबरोबर घटनेच्यावेळी पिडीत मुलीच्या अंगारवर असलेले कपडे जप्त करण्यात आले. त्यानंतर पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून डीएनएसाठी आवश्यक असलेले त्याचबरोबर इतरही रक्ताचे नमुने प्राप्त करण्यात आले. त्यानंतर सर्व जप्त केलेले नमूने / मुद्देमाल वैद्यकीय तपासणीसाठी न्यायवैद्यानिक प्रयोगशाळा कोल्हापूर यांच्याकडे सिल बंद आवस्थेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीकडून कपडे जप्त करण्यात आली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व आरोपीचे रक्त नमूने डीएनएसाठी आवश्यक असलेले नमुने घेण्यात आले. सर्व मुद्देमाल रक्त नमूने हे न्याय वैद्यानिक प्रयोगशाळा कोल्हापूर यांच्याकडे तपासणसाठी पाठविण्यात आले.

पिडीतेचे घटनेच्यावेळचे कपडे जे जप्त केले होते त्यावर आरोपीचे विर्य आढळून आले असा अहवाल न्याय वैद्यानिक प्रयोगशाळा कोल्हापूर यांनी दिला होता याबाबत सरकारी पक्षातर्फे साक्षीदार क्र. १२ सिध्दार्थ रणसिंग मोरे सहा रासायनिक विश्लेषक न्यायवैद्यानिक प्रयोग शाळा कोल्हापूर यांना तपासण्यात आले. त्यांनी आपला अहवाल याकामी दाखल केलेला आहे, त्या अहवालानुसार आरोपी याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याचे शाबीत झालेले आहे. त्यामुळे पिडीतेच्या आईचा जबाब, पिडीतेचा जबाब, वैद्यकीय अहवाल यांना समर्थन करणाराच न्यायवैद्यानिक प्रयोगशाळेचा अहवाल होता. त्याचबरोबर सरकार पक्षातर्फे जे साक्षीदार तपासण्यात आलेत तेही पिडीतेच्या जबाबाशी पुरक झालेले आहेत. कोर्टाच्या समोर झालेल्या जबाबावरुन वैद्यकीय अहवाल व न्याय वैद्यानिक प्रयोगशाळेचा अहवाल या सर्वाचा विचार करुन आरोपी याला याकामी पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत व दुस-या मुलीचा विनयभंग केल्याबाचत दोषी धरण्यात आले आहे.

शिक्षेच्या मुद्यावर सरकारी वकील ए. एम. साटविलकर जोरदार युक्तिवाद केला सदर ची घटना ही अत्यंत निंदनिय आहे यासामाजामध्ये काटुंबिक व्यवस्था टिकविणे आवश्यक आहे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणे करुन समाजाचा में, कोर्टावर असलेला विश्वास दृढ होईल व कायदयाचा वचक समाजावर बसेल व असले गंभीर गुन्हयांना चाप बसेल. त्यामुळे आरोपीला या कायदयानुसार नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपीची शिक्षा व्हावी व त्याचबरोबर जास्तीत जास्त दंड व्हावा व या दंडाची रक्कम पिडीतेच्या भविष्यासाठी आवश्यक असल्याने ति पिडीतेला देण्यात यावी अशी ही विनंती सरकारी वकील यांनी कोर्टाला केली.

यामध्ये आटपाडी पोलीस ठाणेमधील लक्ष्मण मोहन गुरव, त्यावेळी आटपाडी पोलीस ठाणेमध्ये कार्यरत असणारे राजेश अर्जुन गवळी, तसेच सांगली पैरवी कक्षातील श्रीमती सुनिता कांबळे महिला पोलीस  श्रीमती रेखा खोत, श्रीमती वंदना मिसाळ, महिला पोलीस अंमलदार श्रीमती सुप्रिया भोसले, यांचे सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.