विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून
केवळ एक आठवडाच चालणार कामकाज
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन यंदा नेहमीप्रमाणे नागपूरमध्ये होणार आहे मात्र हे अधिवेशन केवळ ८ दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनात अतिवृष्टी ते शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १४ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीतील भरपाई, शेतकरी आत्महत्या आणि इतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते यावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिवेशन तापणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.