"गद्दारांचा बुडबुडा फुटला, आता त्यांच्यातच बाचाबाची"
मुंबई : खरा पंचनामा
नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या नेत्यांवर त्यांच्याच लोकांनी धाडी टाकल्या. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होत्या, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. आता या 'गद्दारांचा बुडबुडा फुटला असून, त्यांच्यातच बाचाबाची सुरु झाली आहे,' अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. "शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतेही चिन्ह नको. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसायला हवा," असे आवाहनही त्यांनी आज (दि. ३ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केले.
मागील दोन-चार वर्षांत आपण ज्या पेगासस स्पायवेअरबद्दल ऐकत होतो, त्याचे नाव बदलून आता संचार साथी ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी ते सामान्य जनतेवर पाळत ठेवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
एकीकडे हे सुरू असताना, दुसरीकडे निवडणूक सुरू असताना सत्ताधारी पक्षाचीच लोकं त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होत्या, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. या सर्व घोटाळ्यांमुळे आता सगळेजण जागे होत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.