Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"शिंदे गटाच्या या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे"

"शिंदे गटाच्या या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे"

जळगाव : खरा पंचनामा

देशभरातील विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खासकरून राहुल गांधी अनेकदा सत्ताधारी पक्षांवर मतचोरीचाही आरोप केला आहे. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित करत असताना आता सत्ताधारी पक्षातील नेतेही तीच भाषा वापरू लागले आहेत.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल, परंतु ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडलेले आहे त्या ठिकाणचा निकालाची आम्ही खात्री देऊ शकत नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना दानवे यांनी, मी बोगस मतदारांचा पुरावा दिलेला आहे, नाव एकाच फोटो दुसऱ्याचा. भोकरदन मधील 3 हजार 200 नाव सिल्लोडमध्ये आहेत आणि ते मी निवडणूक आयोगाला देणार आहे. बाहेरून मतदार घेऊन आणि त्यांचं मतदान डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य नाही. विधानसभेला सुद्धा तेच झालं आणि 100% अब्दुल सत्तारांचा विजय हा बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.