Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

".. अमेरिकेत 'ही' फाईल उघड झाल्यास महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता"

".. अमेरिकेत 'ही' फाईल उघड झाल्यास महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता"

कराड : खरा पंचनामा

Epstein फाईल्स प्रकरणावरून अमेरिकेत मोठा गदारोळ निर्माण झाला असून त्याचे पडसाद भारताच्या राजकारणातही उमटू शकतात. "Epstein ही फाईल उघड झाल्यास देशाच्या राजकीय घडामोडींवर मोठा परिणाम होऊ शकतो.

कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते," असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलंय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "Epstein प्रकरण हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर कृत्ये करत अनेक देशांतील राजकीय व्यक्तींना त्यात गुंतवले आहे. त्या फाईलमध्ये आपल्या देशातील कोणाचे नाव आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."

सुमारे दहा हजार पानांची ही फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल सार्वजनिक करावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ही कागदपत्रे जाहीर झाली, तर अनेक गंभीर गोष्टी समोर येऊ शकतात, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

दरम्यान, ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका व्हिडिओद्वारे लवकरच ही कागदपत्रे त्यांच्या हातात येतील, असे म्हटले आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकन संसद जेव्हा एपस्टाईन फाइल्सची माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतील ? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केला असून त्यांनी आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.