भाजप आमदार फार्महाऊसवर पकडला गेला, ५० लाखात सुटका !
भाजपच्याच माजी नगरसेवकाच्या आरोपाने खळबळ
चंद्रपूर : खरा पंचनामा
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक ३ मधून माजी नगरसेवक अजय सरकार यांना उमेदवारी दिली. मात्र, महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कसुगोट्टूवार यांनी स्थानिक पातळीवर रॉबिन बिस्वास यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे संतापलेल्या सरकार यांनी भाजप आमदारांवर बेछूट आरोप केले आहे. घुघुस येथे फार्महाऊसवर. आक्षेपार्ह स्थितीत पकडल्यानंतर ५० लाख रुपये देऊन सुटका केली. मुलगा ड्रग्स विक्री करताना पकडला गेला तेव्हा १० लाख रुपये देऊन सुटका केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक केला आहे. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या यादीत बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक ३ मध्ये अजय सरकार यांना उमेदवारी मिळाली आहे. तसे अंतिम यादीत सरकार यांचे नाव आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार समर्थक महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोडूवार यांनी स्थानिक पातळीवर यादीत बदल करून रॉबिन बिस्वास यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अजय सरकार चांगलेच संतापले आहेत.
आमदार किशोर जोरगेवार यांनी सरकार यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी करताना सरकार यांच्या विरोधात २० गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी देऊ नये असे म्हटले होते. त्यानंतर लगेच हालचाली झाल्या व शेवटपर्यंत सरकार यांना त्यांच्या नावाने आलेला एबी फॉर्म दिला नाही. दरम्यान त्यांच्या जागेवर रॉबिन बिस्वास यांना उमेदवारी दिली. त्यानंतर सरकार यांनी आमदार किशोर जोरगेवार घुघुस येथे एका फार्महाऊसवर आपत्तीजनक अवस्थेत पकडल्या गेले होते. तेव्हा ५० लाख रुपये देऊन स्वतःची सुटका केली होती. मुलगा ड्रग्स विक्री प्रकरणात पकडला गेला तेव्हा १० लाख रुपये देऊन सुटका केली असाही आरोप केला. २०१२ मध्ये आमदार किशोर जोरगेवार शिवसेना पक्षात असताना मी त्यांच्या सोबत होतो. स्वतःचे व आमदार किशोर जोरगेवार यांचे छायाचित्र दाखविताना तेव्हा मी चांगला होतो आणि आता वाईट कसा असाही प्रश्न केला. दरम्यान सरकार यांच्या आरोपामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.