Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अरे वो रो रहे है, एक जगह तो शिवसेना-भाजप युती रखो'

'अरे वो रो रहे है, एक जगह तो शिवसेना-भाजप युती रखो'

डोंबिवली : खरा पंचनामा

स्वबळाचा नारा देत भाजपने ठाणे जिल्ह्यासह इतर महापालिका निवडणुका स्वबळाच्या ताकदीवर लढविण्याची तयारी केली होती. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यामध्ये आक्रमक होते. भाजपच्या या आक्रमक बाण्याने ठाणे जिल्ह्यातील महापालिका तरी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष, भाजपने युती म्हणून लढवाव्यात यासाठी शिंदे शिवसेनेचे शीर्षस्थ नेते आग्रही होते.

भाजपच्या या आक्रमक बाण्याची युतीमधील एका बड्या नेत्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली. अखेर युतीमधील 'या' नेत्याविषयी नेहमीच सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेत्याने भाजपच्या एका राज्यस्तरिय बड्या नेत्याला संपर्क करून, 'अरे वो रो रहे है, एक जगह याने कल्याण डोंबिवली मे तो शिवसेना-भाजप युती रखो,' असे सुचविले.

'किमान कल्याण डोंबिवलीत तरी युती ठेवा, बाकी इतर महापालिकांचे तुम्ही ठरवा,' असा सूचक सल्ला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या एका बड्या नेत्याला दिल्याने या नेत्याने आपल्या मोजक्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपली स्वबळाची भूमिका थोडी नरम केली. आपल्या केंद्रीय नेतृत्वाच्या शब्दाचा मान ठेवणे आवश्यक असल्याने कल्याण डोंबिवलीतील भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शांत राहणे पसंत केले, अशी माहिती भाजपमधील खास विश्वसनीय सुत्राने दिली. स्वबळाचा नारानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने पहिल्या क्रमांकाचा जागा आणि नगराध्यक्ष पदे पटकावली.

पालिका निवडणुकीत स्वबळाने निवडणुका लढव असे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत होते. कल्याण डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी सहा महिन्यांपासून पालिकेवर भाजपचाच महापौर आणि कल्याण डोंबिवली भाजपमय करण्याच्या विचाराने कामाला लागले होते. कोणत्याही परिस्थितीत कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटावर बरोबर युती करायचीच नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपच्या कल्याण, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कल्याण डोंबिवली ही राजकीय कार्यभूमी आहे, त्यामुळे कडोंमपावर भाजपचाच महापौर बसेल यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मुठी आवळल्या होत्या.

शिवसेनेची कोंडीभाजपच्या साथीने शिवसेनेने २५ वर्ष पालिकेवर महापौर पद उपभोगले. कल्याण लोकसभेचा खासदार शिवसेनेचा आहे. राम कापसे, प्रमोद महाजन यांच्या वादात भाजपची कल्याणची जागा शिवसेनेला गेली. ती जागा परत मिळविण्याचा भाजपचा मानस आहे. ती परत मिळविण्यासाठी भाजपचा एक गट आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेतील उल्हासनगर, कल्याण डोंबिवली पालिका भाजपच्या ताब्यात गेल्या, तर लोकसभेच्यावेळी भाजप खासदारकीवर दावा करू शकते, अशी भीती युतीमधील काही शीर्षस्थ नेत्यांना आहे. अशा काही घडोमोडी तात्काळ होऊ नयेत. आपल्या वारसाची खासदारकी धोक्यात येऊ नये म्हणून युतीमधील एक शीर्षस्थ नेत्याने भाजप स्थानिक नेते कार्यकर्त्यांसोबत स्वबळासाठी आग्रही असल्याचे गाऱ्हाणे भाजप केंद्रीय नेतृत्वाकडे मांडले.

संयम, शांततेची भूमिका घेत भाजप केंद्रीय ज्येष्ठ नेत्याने भाजपच्या एका राज्यस्तरिय, राज्य भाजपमय करण्यास निघालेल्या एका नेत्याला संपर्क करून, 'अरे भाई, ओ रो रहे है. एक जगह तो युती रखो,' असे सांगत कल्याण डोंबिवलीत तरी युती घट्ट ठेवा, अशी सूचना केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.