मेलेला माणूस जिवंत झाला; पोलीस तपासात समोर आलं चक्रावून टाकणारं सत्य
लातूर : खरा पंचनामा
लातूरच्या औसा तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडलीय. विम्याच्या पैशासाठी एका तरुणाने मृत्यूचा बनाव केल्याची घटना घडलीय. एका करमध्ये एका तरुणाचा जळून मृत्यू झाल्याची घटना औसा तालुक्यातील वानवाडा शिवारात घडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या पोलीस तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं.मृत्यूचा बनाव केला होता. मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून गणेशनं आपल्याच मृत्यूचा बनाव केला. औसा तालुक्यातील वानवाडा शिवारात कारमध्ये एकाला पोत्यात बांधून गाडीसहित जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला होता. त्यांच्या तपासात गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक व आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तसेच एक कोटीच्या इन्शुरन्स लाभापाई स्वतः मेल्याचा खोटा प्रसंग रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 24 तासाच्या आत स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या गणेश चव्हाण याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशीत त्याने मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली दिली. या प्रकरणी हत्या, फसवणूक, खोटी माहिती देणे व पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश चव्हाण असं आपल्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. गणेशनं विम्यांचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याच मृत्यूचा बनाव केला होता. मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून गणेशनं आपल्याच मृत्यूचा बनाव केला. औसा तालुक्यातील वानवाडा शिवारात कारमध्ये एकाला पोत्यात बांधून गाडीसहित जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला होता. त्यांच्या तपासात गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक व आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तसेच एक कोटीच्या इन्शुरन्स लाभापाई स्वतः मेल्याचा खोटा प्रसंग रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 24 तासाच्या आत स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या गणेश चव्हाण याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशीत त्याने मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली दिली. या प्रकरणी हत्या, फसवणूक, खोटी माहिती देणे व पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.