Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संरक्षण मंत्रालयात खळबळ ! लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्माच्या घरी CBI चा छापा

संरक्षण मंत्रालयात खळबळ ! 
लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्माच्या घरी CBI चा छापा

दिल्ली : खरा पंचनामा

केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने शनिवारी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा उत्पादन विभागात कार्यरत असणाऱ्या लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली.

बंगळुरूमधील कंपनीकडून त्यांनी कथितरित्या तीन लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शर्मा यांच्या घराची झडती घेतली असता तिथे २.२३ कोटी रुपयांची रोकड आढळून आली.

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि निर्यात प्रकरणांशी संबंधित डेप्युटी प्लॅनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी कर्नल काजल बाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कर्नल बाली या सध्या राजस्थानच्या श्री गंगानगर येथील १६ इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डिनन्स युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून तैनात आहेत. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट कर्नल शर्मा हे संरक्षण उत्पादनांचे निर्माण आणि निर्यातीशी जोडल्या गेलेल्या अनेक खासगी कंपन्यांशी संगनमत करून फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित कारवायांमध्ये गुंतले होते.

सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, कंपन्यांना लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात शर्मा यांनी रोख रक्कम घेतली होती. बंगळुरू स्थित एका कंपनीकडून शर्मा यांना रोकड मिळणार असल्याची माहिती सीबीआयच्या हाती लागली होती.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार राजीव यादव आणि रवजीत सिंह नावाचे दोन इसम लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्या नियमित संपर्कात होते. त्यांच्या कंपनीला लाभ मिळण्यासाठी ते अवैध मार्गांचा वापर करत होते. १८ डिसेंबर २०२५ रोजी या कंपनीच्या इशाऱ्यावर विनोद कुमार नामक व्यक्तीने दीपक कुमार शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच दिली.

शर्मा यांच्या दिल्लीस्थित घरात झडती घेतली असता २.२३ कोटी रुपयांची रोकड आणि लाच म्हणून स्वीकारलेले ३ लाख रुपये आढळून आले आहेत. तसेच श्रीगंगानगर येथील पत्नीच्या निवासस्थानाहून १० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. शनिवारी शर्मा आणि विनोद कुमार यांना विशेष न्यायालयात सादर केले असता त्यांना २३ डिसेंबर पर्यंतची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.