'इंडिगो'वर DGCA ची कठोर कारवाई; चार वरिष्ठ अधिकारी निलंबित
नवी दिल्ली : खरा पंचनामा
इंडिगो ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. देशभरातील इंडिगोच्या विमान सेवेत मोठा व्यत्यय आल्यामुळे हजारो विमाने रद्द झाली आणि देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले.
यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला समोरे जावे लागले होते. यानंतर आता भारताची विमान वाहतूक नियामक संस्था म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) आपल्या चार फ्लाइट ऑपरेशन्स इनस्पेक्टर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. इंडिगोची विमान वाहतूक विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी हे एफओआय म्हणून ओळखले जातात, आणि ते डीजीसीएचे वरिष्ठ सदस्य आहेत. या अधिकाऱ्यांकडे नियमन करणे, सुरक्षा देखरेख यासंबंधी जबाबदारी असते. तसेच विमान कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची त्यांची नियमितपणे नेमणूक केली जाते.
निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कन्सल्टंट ऋष राज चॅटर्जी, एसएफओ सीमा झमनानी, कन्सल्टंट अनिल कुमार पोखरियाल, आणि कंसल्टंट प्रियम कौशिक यांचा समावेश आहे.
एफओआय हे डीजीसीएचे ते अधिकारी असतात ज्यांना विमान कंपनीच्या ऑपरेशन्सवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केले जाते, आणि ते विमान कंपनीच्या नियामक देखरेखीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. "इंडिगोच्या सेवांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात झालेल्या अडथळ्यांबाबत चार फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टरना निलंबित करण्यात आले आहे," असे एका सूत्राने सांगितले.
या अधिकाऱ्यांची जबाबदारी एअरलाइन्स बरोबरच वैमानिक, डिस्पॅचर, आणि केबिन क्रू यासारख्या कर्मचाऱ्यांची इन्स्पेक्शन्स, ऑडिट आणि सर्टिफिकेशन याच्या माध्यमातून सुरक्षा सुनिश्चित करणे ही असते. त्यांच्या कामामध्ये एव्हिएशनच्या नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि प्रशिक्षण, फ्लाइट स्टैंडर्डर्स आणि अपघात टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांवर देखरेख ठेवणे यांचा समावेश असतो.
इंडिगोने शुक्रवारी एका दिवसात बंगळुरू विमानतळावरील ५० हून अधिक विमान उड्डाणे रद्द केली. सुत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोने शुक्रवारी बंगळुरू विमानतळावर ५४ फ्लाइट्स रद्द केल्या, ज्यापैकी ३१ विमाने तेथे येणारी आणि २३ विमाने तेथून उड्डाण करणारी होती. कंपनीने गुरुवारी दिल्ली आणि बंगळूरुमधून होणारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.