महाराष्ट्र गारठला; राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षाही थंड
पुणे : खरा पंचनामा
उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळं महाराष्ट्र गारठला आहे. राज्याला हुडहुडी भरली आहे. राज्यभरातील नेक शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास अथवा त्यापेक्षा खाली उतरले आहे.
अति गारठ्यामुळे राज्यातील १७ शहरांचं तापमान महाबळेश्वर या थंडीच्या ठिकाणापेक्षाही कमी झाले आहे. महाराष्ट्र थंडीने गपगार झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. तर स्वेटर, टोपी, मफलर बाहेर आली आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगर मध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला आहे. उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट असेल. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा ७ ते १० अंशांपर्यंत खाली आले आहे. अहिल्यानगरमध्ये ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी परभणी तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतके आहे. हवामान विभागाने पुढचे काही दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगरः ६.६
पुणेः ७.९
जळगावः ७.0
कोल्हापूरः १४.४
महाबळेश्वरः ११.१
मालेगावः ८.८
नाशिकः ८.२
सांगली: १२.३
सातारा: १०.०
सोलापूरः १३.२
छत्रपती संभाजीनगरः १०.८
परभणीः १०.४
अकोला: १०.०
अमरावतीः १०.२
बुलढाणाः १२.२
गोंदियाः ८.०
नागपूरः ८.१
वर्धाः ९.९
यवतमाळ: १०
पुढील 2 दिवसांत सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील 48 तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने 16 जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.