1 फेब्रुवारी नाही आता 'या' दिवशी सादर होणार केंद्रीय बजेट!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यावर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी बजेट सादर करणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मोदी सरकारने बजेट सादर करण्याची तारीख बदलण्या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी नाही तर 30 जानेवारी रोजी सादर केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय बजेट सादर केलं जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार 28 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच अभिभाषण होईल, 29 जानेवारी रोजी इकोनॉमिक सर्वे होईल आणि 30 जानेवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाच्या संसदेत नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.
सूत्रांच्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी नाही तर 30 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारी हे बजेट सादर करतील. यासोबतच ते एक आणखीन रेकॉर्ड बनवतील. देशात असं पहिल्यांदाच होईल की अर्थमंत्री निर्मला सीतारमण 30 जानेवारीला बजेट सादर करतील. यापूर्वी 2017 पासून सुरु असलेल्या परंपरेनुसार देशाचं बेजट हे 1 फेब्रुवारीला सादर व्हायचं. अशी शक्यता वर्तवण्यात येतेय की यावेळी 1 फेब्रुवारीला रविवार येत असल्याने बजेट सादर करण्याच्या तारखेत बदल करण्यात आलाय. त्यामुळे बजेट हे 1 फेब्रुवारीनंतर नाही तर दोन दिवसांपूर्वी सादर केलं जाईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमणने पेपरलेस बजट सादर करून इतिहास रचला आणि नवी परंपरा सुरु केली. त्यांनी कोरोना पाहणारी दरम्यान 2021 च्या 1 फेब्रुवारी रोजी पेपरलेस बजेट सादर केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.