पुण्यात वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता
वरिष्ठांनी मानसिक छळ केल्याचा चिठ्ठीत आरोप
पुणे : खरा पंचनामा
पुण्यामधील पोलीस खात्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता झालेत. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडे वाहतूक विभागात ते कार्यरत होते. वरिष्ठांना छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता ते संशायस्पदरित्या बेपत्ता झालेत. ते बेपत्ता झाल्यानंतर नोट सापडलीय. या नोटमध्ये त्यांनी वरिष्ठांनी शिवीगाळ करत मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय. त्यांच्या नोटमुळे मोठी खळबळ उडालीय.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव केरबा डोके (३६ वर्षे) असं बेपत्ता झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. माधव डोके हे तळेगाव दाभाडे वाहतूक विभागात काम करत होते. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, असावी असा शंका व्यक्त केली जात आहे. माधव डोके यांनी लिहिलेल्या नोटमुळे खळबळ उडालीय. वरिष्ठांच्या त्रासाला ते कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असावे असं म्हटलं जात आहे.
माधव डोके यांनी लिहिलेल्या नोटमध्ये वरिष्ठावर गंभीर आरोप केले आहेत. 'कर्तव्यावर असताना वारंवार पावती न फाडता गाड्या सोडत जा आणि संध्याकाळी मला येऊन भेटत जा. मी त्यांना नाही म्हणताच त्यांनी मला शिवीगाळ केली. वारंवार मानसिक छळ करीत आहेत. तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात नो एन्ट्रीमध्ये 200 रुपये घेऊन त्यांच्या पोलीस गाडीच्या चालकाने गाड्या सोडल्या. एपीआय लोंढे यांच्यापुढे त्या पोलिसांना हजर केले असता ते म्हणाले ठीक आहे असे म्हणत पैसे घेऊन त्यांनी गाड्या सोडल्या.'
तसंच, 'एपीआय लोंढे यांनी मलाच शिवीगाळ केली. हा मनस्ताप मला सहन झाला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.', असे वाहतूक पोलीस माधव डोके यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले आहे. माधव डोके यांची नोट पोलिसांना मिळाली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्यानं पुणे पोलीस दलात खळबळ उडालीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.