डोडामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 10 जवानांना वीरमरण; सात जखमी
जम्मू : खरा पंचनामा
जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. लष्कराचे वाहन दरीत कोसळून 10 जवानांना वीरमरण आले, तर सात जवान जखमी झाले आहेत. लष्कर आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आहे. भादरवाह-चंबा रोडवर ही घटना घडली.
लष्कराचे लष्कराचे बुलेट प्रूफ वाहन डोडा येथील भादरवाह-चंबा रोडवरून चालले होते. वाहनात एकूण 17 जवान होते. या रस्त्याची अवस्था आधीच खूप बिकट होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते 200 फूट खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांना अपघातस्थळावरून बाहेर काढत जवळच्या वैद्यकीय छावणीत नेण्यात आले. जखमींपैकी तीन सैनिकांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.