Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वर्षात 5 वेळा नियम तोडल्यास तीन महिने गाडी चालवता येणार नाही!

वर्षात 5 वेळा नियम तोडल्यास तीन महिने गाडी चालवता येणार नाही!

नवी दिल्ली : खरा पंचनामा

रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता, एखादा वाहनचालकाने वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर त्याला तीन महिन्यांसाठी गाडी चालवण्यास बंदी घालता येईल.

1 जानेवारीपासून लागू झालेले हे नियम भारतीय रस्त्यांवर शिस्त आणण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल मानले जात आहे. सरकारचा स्पष्ट संदेश असा आहे की, नियम मोडल्याबद्दल दंड भरून वाहनचालक आता सुटू शकत नाहीत; त्याऐवजी, त्यांनी त्यांचा परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक लहान किंवा मोठा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नवीन मोटर वाहन नियमांनुसार, आता आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयांना ही शक्ती दिली आहे की, ते वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांच्या लायसेन्सवर निलंबनाची कारवाई सुरु करु शकतील.

खरंतर असं करण्यापूर्वी लायसेन्स धारकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. अधिसूचनेमध्ये सांगितले आहे की, उल्लंघनाची गणना एक वर्षाच्या कालावधीच्या आत केली जाईल. चांगली बातमी अशी आहे की मागील वर्षातील उल्लंघने पुढील वर्षाच्या गणनेत जोडली जाणार नाहीत, म्हणजेच, उल्लंघनाची नोंद दरवर्षी आपोआप शून्य मानली जाईल.

आतापर्यंत, ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची प्रोसेस प्रामुख्याने 24 गंभीर गुन्ह्यांपर्यंत मर्यादित होती, ज्यात वाहन चोरी, अपहरण, प्रवाशांवर हल्ला, ओव्हरलोडिंग आणि अतिवेग यांचा समावेश होता. तसंच, नवीन तरतुदीने त्याची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली आहे.

एखाद्या चालकाने रेड लाइट जंप केली, हेल्मेट घालत नाही किंवा वर्षातून पाच वेळा सीट बेल्ट लावत नाही, तर त्याला "सवयीचे गुन्हेगार" म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते आणि त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. सरकारचा असा विश्वास आहे की या किरकोळ चुकांमुळे अनेकदा मोठे रस्ते अपघात होतात आणि सार्वजनिक धोका निर्माण होतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.