वर्षभरात 12 सापळे रचून 16 जणांवर गुन्हे दाखल
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : उपाधीक्षक इनामदार
सांगली : खरा पंचनामा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन 2025 मध्ये एकूण 12 सापळा कारवाई करुन 16 आरोपी लोकसेवक/खाजगी इसम यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती ॲन्टी करप्शन ब्युरो सांगलीच्या पोलीस उप-अधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय विभागनिहाय केलेली कारवाई व कंसात आरोपी लोकसेवकांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे. महसूल 5 (7), पोलीस 1 (1), जिल्हा परिषद 2 (3), महानगरपालिका 1 (1), समाजकल्याण 1 (1), कृषी 1 (1), गृहनिर्माण 1 (1) व एका खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानीत मंडळे/संस्था यांचे अधिकारी/कर्मचारी, महापालिका/ नगरपालिका/जिल्हापरिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी, कर्मचारी इत्यादी लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, बदाम चौक, पोलीस लाईन शेजारी, सांगली टोल फ्री नंबर 1064, फोन क्रमांक 0233-2373095, किंवा मोबाईल क्रमांक 9404041064 वर करावी, असे आवाहनही उपाधीक्षक इनामदार यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.