Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात खळबळ! छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात 155 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात खळबळ! 
छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात 155 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

महाराष्ट्रात 26 महापालिकांसाठी मतदान सुरु असताना खळबजनक प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. आदेशाचे पालन न करणे पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने ही कारवाई केली आहे.

निवडणूक विभागाने सिटी चौक पोलीस ठाण्याला गैरहजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी दिली. कलम 134 लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 155 कर्मचाऱ्यांना 14 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते 15 जानेवारी पर्यंत रोजी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रीया पुर्ण होवून नेमुन दिलेल्या निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणुक साहीत्य जमा करे पर्यंत ड्युटी लावण्यात आली होती. आयुक्तांनी तसे लेखी आदेश या पोलिस कर्मचाऱ्यांना दिले होते. लेखी आदेश असतांना सुध्दा निवडणुककामी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या कामकाजा करीता हजर झालेले नाहीत यामुळे यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी तक्रारीद्वारे केली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.