Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संभाजीनगरात पोलिसांकडून शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर बेदम लाठीचार्ज

संभाजीनगरात पोलिसांकडून शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर बेदम लाठीचार्ज

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. इथं शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यावरून झालेल्या वादानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शिंदे गटाचे समर्थक जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी लाठीचार्ज केल्याचे व्रण उमटले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेज मतमोजणीला सुरुवात होणार आहे. याठिकाणी उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत मध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींवर लाठीचार्ज केला.

या घटनेनं मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. विकास जैन असं मारहाण झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. जैन यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओमध्ये किंकाळ्या, आरोळ्या आणि आक्रोश ऐकायला येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.