काँग्रेसने 29 महानगरपालिकांपैकी पहिली महापालिका जिंकली, विरोधकांचा धुव्वा उडवला !
लातूर : खरा पंचनामा
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणिराष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुंसडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीला लातूर पालिकेत 37 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
एकूण प्रभाग 18 - जागा 70
भाजपा - 14
काँग्रेस 32
वंचित मबहुजन आघाडी 05
राष्ट्रवादी अजित पवार गट -
राष्ट्रवादी शरद पवार गट -
शिवसेना शिंदे -
शिवसेना ठाकरे -
लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे. यामध्ये काँग्रेसला 32 आणि वंचित बहुजन आघाडीला 5 जागा मिळाल्या आहेत. एकूण 37 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसचा महापौर होणार हे निश्चित मानलं जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.