गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी जालन्यातून विजयी
जालना : खरा पंचनामा
राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान जालन्यातील एका निकालामुळे तीव्र चर्चा सुरू झाली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपी असलेले श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे.
त्यांच्या या विजयानंतर साजऱ्या करण्यात आलेल्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विजयानंतर श्रीकांत पांगारकर यांनी कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नाचत-गात साजरा करण्यात आलेल्या या विजयाचे दृश्य सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. या हत्या प्रकरणात श्रीकांत पांगारकर यांच्यावर आरोपी म्हणून आरोप ठेवण्यात आले आहेत. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना या प्रकरणात अटक केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.