पोक्सो गुन्ह्यात 42 दिवस फरार असणाऱ्या शिरोळमधील एकाला अटक
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून 42 दिवस पसार झालेल्या शिरोळ तालुक्यातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी जयसिंगपूर ते अंकली असा पाठलाग करून ही कारवाई केली.
शरद दयानंद कांबळे (वय 35, रा. शाहुनगर, कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 4 डिसेंबर रोजी कांबळे याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून संशयित पसार झाला होता.
पोलिसांना तो जयसिंगपूर ते अंकली मार्गांवरून जात असल्याची माहिती मिळाली. अंकलिपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. ए. तळेकर, उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, अभिजित पाटील, आकाश ऐवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.