Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अधिकार काढून घेतले, बदल्या करण्यासाठी मनाईच्या चर्चा थांबणार!43 लिपीक, 42 शिपायांच्या पदोन्नतीसह अधिकाऱ्यांच्या बदल्याद्वारे डॅशिंग अधिकाऱ्याचे सणसणीत उत्तर

अधिकार काढून घेतले, बदल्या करण्यासाठी मनाईच्या चर्चा थांबणार!
43 लिपीक, 42 शिपायांच्या पदोन्नतीसह अधिकाऱ्यांच्या बदल्याद्वारे डॅशिंग अधिकाऱ्याचे सणसणीत उत्तर 

सांगली : खरा पंचनामा 

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या गतवर्षी करण्यात आल्या नाहीत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तसेच अन्य काही कारणांमुळे त्या थांबल्या होत्या. त्यामुळे बदलीचे अधिकार असणाऱ्या एका साहेबांचे बदल्यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांना बदल्या करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे, अशा चर्चाना ऊत आला होता. मात्र गेल्या दोन महिन्यात त्या 'डॅशिंग' अधिकाऱ्यांनी 42 शिपाई आणि 43 लिपिकांना पदोन्नती देऊन त्यांची पदस्थापना केली. याच काळात निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या विशेषतः विनंती बदल्या करून त्या अधिकाऱ्यांनी चर्चाना सणसणीत उत्तर दिले आहे.

एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या काळात फक्त होम डिस्ट्रिक्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. केंद्र आणि राज्यातील सरकार नुकतेच सत्तेवर आल्यानंतर दरवर्षी मार्च ते जून दरम्यान होणाऱ्या बदल्या काही प्रमाणातच झाल्या. गतवर्षी ऐन बदल्यांच्या काळात एका महाशयानी मुदतवाढ विषयावर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे पत्र महासंचालक कार्यालयाला पाठवले. त्यानंतरही काही प्रमाणात बदल्या झाल्या. 

या सर्व बाबी घडत असताना काही अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी मोठ मोठे वशिले लावले. एक्सेस होत असतानाही बदल्यांसाठी त्या साहेबांवर खूप दबाव टाकला. यामुळेही बदल्या रखडल्या. बदल्या होत नसल्याने अधिकार काढून घेतल्याच्या तसेच बदल्या करण्यासाठी मनाई केल्याच्या चर्चा काही असंतुष्ट आत्मे करत होते. मात्र यावर ते साहेब मौन बाळगून होते. त्यांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही.

मात्र गेल्या दोन महिन्यात 42 शिपाई आणि 43 लिपिकांना पदोन्नती देऊन पदस्थापना देण्यात आली. याच काळात निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या विशेषतः विनंती बदल्या करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या चर्चाना सणसणीत उत्तर दिले आहे. त्यामुळे ती चर्चा करणाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.