गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कारवाईत भारती विद्यापीठ पोलिसांना यश मिळाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिंतीच्या आधारे नवले पुलाजवळील राजमाता उद्यानासमोरील सर्व्हिस रोडवर गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली.
अभिषेक कैलास दांगट (वय 19) फ्लॅट नंबर 507 वृंदावन विश्व तानाजी नवले इंडस्ट्रीज नऱ्हे रोड पुणे) असे आरोपींचे नाव आहे. एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी आपल्या पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिसांना कारवाईबाबत सूचना दिल्या. पथकाने तेथे जावुन पाहणी केली असता तो तरुण गावठी कट्टा व जिवंत काडतुसे ते घेवुन थांबला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधांत गुन्हा दाखल केला. सदर कारवाईत त्याच्या ताब्यातून 50 हजारांचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, नितेश चोरमोले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.