Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात वर्षभरात 68 क्लास वन अधिकारी लाच लाच लुतपतच्या जाळ्यात!लाचखोरीत नाशिक पहिला, पुणे दुसरा तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानावर

राज्यात वर्षभरात 68 क्लास वन अधिकारी लाच लुतपतच्या जाळ्यात!
लाचखोरीत नाशिक पहिला, पुणे दुसरा तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानावर

मुंबई : खरा पंचनामा

राज्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या वर्षभरात सर्वाधिक लाचखोरीचे सापळे नाशिक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर करण्यात आले. तर दुसऱ्या स्थानावर पुणे तर तिसऱ्या स्थानावर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे.

नाशिकमध्ये 138 सापळा कारवाईत 210 लाचखोर अधिकारी-कर्मचारी अडकले तर पुण्यात 124 सापळा कारवाईत 181 जण लाचखोरीच्या गुन्ह्यात अडकले, ही आकडेवारी राज्य भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने जाहीर केली आहे.

गेल्या काही महिन्यांत राज्यातील लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक लाचखोरी महसूल आणि पोलिस भागात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील आठ विभागाची सापळ्याची आकडेवारी एसीबी विभागाने जाहीर केली. कोणत्याही शासकीय कामासाठी लाच द्यावी लागते, हे सत्य आहे. पोलिस, महसूल, शिक्षण आणि जिल्हा परिषद या विभागात तर जवळपास प्रत्येक काम करण्यासाठी किंवा फाईल समोर ठेवण्यापूर्वी लाच द्यावी लागते. अनेकदा लाच मागून छळल्या जाते. त्यामुळे नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करतात. राज्यात एसीबीने सर्वाधिक कारवाई नाशिक विभागात केली. नाशिकमध्ये 138 सापळा कारवाई करीत 210 लाच घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक केली. दुसऱ्या स्थानावर पुणे शहराचा क्रमांक असून एसीबीने 124 सापळा कारवाई केली असून 181 लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तिसऱ्या स्थानावर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात 109 सापळ्यात 160 लाचखोर अडकले असून चौथ्या स्थानावर ठाणे विभागाचा क्रमांक असून 83 सापळ्यात 125 लाचखोरांना अटक केली.

नागपूर शहर हे सातव्या स्थानावर असून 54 सापळा कारवाईमध्ये 78 लाचखोरांना अटक करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्याने शंभर रुपयांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंत लाच मागितल्याची प्रकरणे एसीबीकडे दाखल आहेत. राज्यात 682 सापळा कारवाईमध्ये 1 हजार 9 लाचखोर अडकल्याची माहिती एसीबीने संकेतस्थळावर प्रकाशित केली.

राज्यात महसूल विभागातील सर्वाधिक लाचखोर कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. राज्यात महसूल विभातील 168 सापळ्यात 248 लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या स्थानावर पोलिस विभाग असून 120 सापळ्यात 172 पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली. तर तिसऱ्या स्थानावर पंचायत समिती असून 69 सापळ्यात 98 लाचखोरांना अटक करण्यात आली. त्यानंतर लाचखोरीत वीज विभाग आणि महानगर पालिका विभागाचा क्रमांक लागतो.

राज्यात लाचखोरांचा आकडा मोठा असून वर्षभरात 669 सापळा कारवाई करण्यात आल्या असून 988 अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यात तब्बल 68 क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच वर्ग दोनच्या 126 लाचखोर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 3 कोटी 54 लाख रुपये एवढी रक्कम लाचखोरांकडून जप्त केली आहे. 447 तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश लाचखोरीच्या प्रकरणात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.