Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई-पुण्यात महिला, 8 जिल्ह्यांत OBC महापौरसांगलीत खुला तर इचलकरंजी कोल्हापूरमध्ये ओबीसी

मुंबई-पुण्यात महिला, 8 जिल्ह्यांत OBC महापौर
सांगलीत खुला तर इचलकरंजी कोल्हापूरमध्ये ओबीसी

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले असून, नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

ठाणे - अनुसुचित जाती (महिला किंवा पुरुष )
29 महापालिकांपैकी आठ महापालिकेत आरक्षण असेल आठ महापालिकेत ओबीसी महापौर
पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर, उल्हास नगर, चंद्रपूर, जळगाव यात ओबीसी होणार महापौर, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव, अकोला महिलांसाठी राखीव.

17 महापालिका खुल्या अमरावती, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नवी मुंबई, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई, मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली, सोलापूर
मुंबई महापालिकेत खुला प्रवर्ग जाहिर.

१७ महानगरपालिका खुल्या प्रवर्गात आता यापैकी ९ ठिकाणी महिला महापौर होणार
15 महापालिका खुल्या, सर्वसाधारण महिला महापौर - पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर

सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात चक्राकार पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठीचे ५० टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे आगामी अडीच वर्षांसाठी कोणत्या महापालिकेवर कोणत्या गटाचे वर्चस्व असेल, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

यावेळच्या सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी असलेले ५० टक्के आरक्षण. यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.