सोन्यात गुंतवणूक करून जादा नफ्याचे आमिष : महिला पोलीस कर्मचारी बडतर्फ
जळगाव : खरा पंचनामा
सोन्यात गुंतवणूक करून जादा नफ्याचे आमिष दाखवून पोलिस दलातील व इतर महिलांना गंडविणाऱ्या जळगावच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला भोवले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस दलाच्या मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी अर्चना प्रभाकर हिला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली.
पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटीलने पोलिसांसोबत खासगी नोकरदार महिलेला ४ लाखांत गंडवल्याचे समोर आले आहे. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून १ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात आली. चौकशीत अर्चना पाटील दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
सोन्यात गुंतवणूक केल्यास जादा नफा होईल, असे सांगून दोघांना ३० लाख रुपयांत फसवणाऱ्या पोलिस कर्मचारी अर्चना प्रभाकर पाटील (रा. आशाबाबानगर, जळगाव) हिच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली. दरम्यान, जिल्हासह शहरात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांना चुना लावले जात आहे. यात सर्वाधिक सायबर ठगाचे समावेश आहे.
सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पार्टनरचा ग्रुप दुबईवरून सोने कमी भावात आणून ते सोने इथे सराफांना जास्त भावात विकतो. त्यात जास्त नफा मिळतो. तू माझी मैत्रीण आहे म्हणून तुला ही स्कीम सांगते, असे अर्चनाने अनेकांना सांगून पैसे घेऊन अनेकांना परतही केले होते. त्यामुळे सर्कल वाढून अनेक जण यात सहभागी झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.