Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणारराज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत.

मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

केडीएमसीत भाजपचे 14 व शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार, तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) व आपचे उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड 'ए' कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद नाही. 2 जानेवारी (नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख) नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील.

निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली अजून आतापर्यत भाजपाचे 45 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल 19 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 15 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार बिनविरोध झाले, याची संपूर्ण यादीही समोर आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.