सांगलीत काँग्रेसकडून सत्ता स्थापनेबाबत प्रयत्न सुरू : विश्वजित कदम
काँग्रेसच्या विजयी नगरसेवकांनी केले कै. पतंगराव कदम यांच्या स्मारकाला अभिवादन
सांगली : खरा पंचनामा
सांगली महापालिकेत काँग्रेस दोन नंबरचा पक्ष बनला असून सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसच्या समविचारी पक्षांसोबत आम्हीही प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सांगली महापालिकेत काँग्रेसच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी वांगी येथील कै. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते. आमदार कदम म्हणाले, काँग्रेस हा पक्ष सोडून ज्या पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेस आहे ते सर्व आमच्या संपर्कात आहेत, सत्ता स्थापनेबाबत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे.
आज सांगली महापालिकेत काँग्रेस हा दोन नंबरचा पक्ष बनला आहे. ज्या समविचारी पक्षांचे नगरसेवक निवडून आलेत ते आमच्या संपर्कात आहेत, त्या पक्षाकडून आमच्याकडे काही प्रस्ताव आलेले आहेत, आज या प्रस्तावाबत बसून चर्चा करू असे कदम म्हणाले. तसेच सांगलीत 55 जागाच्या वर आम्ही जिंकू असं म्हणणाऱ्या भाजपला बहुमत गाठता आलं नाही हाच त्यांना मोठा धक्का अशी टीका कदम यांनी भाजपवर केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.