Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

GST अधिकाऱ्याच्या मृत्यूचं कोडं सुटलंकारमध्ये सापडलं पत्र, पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव अन्...

GST अधिकाऱ्याच्या मृत्यूचं कोडं सुटलं
कारमध्ये सापडलं पत्र, पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव अन्...

बीड : खरा पंचनामा 

बीड शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असलेल्या एका वरिष्ठ जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच चारचाकी गाडीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

या प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आली असून, या अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची माहिती समोर आली आहे. हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. या घटनेने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सचिन नारायण जाधवर (वय 45, रा. बीड) असे मृत पावलेल्या अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती आहे. जाधवर हे वस्तू व सेवा कर विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. काल रात्री ते कामावरून घरी परतले नाहीत आणि त्यांचा फोनही लागत नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. अखेर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाधवर बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

शनिवारी (17 जानेवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कपिलधार कमानीजवळील बायपास रोडवर, पाली परिसरात त्यांची कार उभी असल्याचे काही नागरिकांना दिसले. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, गाडीत सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाचा पंचनामा केला आणि जाधवर यांच्या कारची कसून झडती घेतली. तेव्हा त्यांना गाडीत एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीमध्ये सचिन जाधवर यांनी आपल्या टोकाच्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आहे. जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांच्या छळाला कंटाळून आपण आपले जीवन संपवत असल्याचा धक्कादायक उल्लेख त्यांनी या नोटमध्ये केला आहे. वरिष्ठांकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये नाव असलेले आरोपी अधिकारी दिलीप फाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाबाबत सुसाईड नोट मिळाल्याने, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जीएसटी विभागातील अंतर्गत वादातून हा प्रकार घडला का, याचीही चौकशी केली जाणार आहे. पोलीस जाधवर आणि संशयित आरोपी अधिकारी यांच्यातील गेल्या काही दिवसांतील संवाद आणि व्यवहारांची माहिती घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.