Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पोलीसच भ्रष्टाचार करताहेत', बिल्डरकडे मागितले ४ लाखलोकायुक्तांनी रंगेहात पकडलं, लोकांनी उचलून नेलं तुरुंगात

'पोलीसच भ्रष्टाचार करताहेत', बिल्डरकडे मागितले ४ लाख
लोकायुक्तांनी रंगेहात पकडलं, लोकांनी उचलून नेलं तुरुंगात

बंगळूरू : खरा पंचनामा

कायद्याचं संरक्षण करण्याची शपथ घेतलेला पोलीसच भ्रष्टाचार करताना पकडला गेला. या पोलीस कर्मचाऱ्यानं एका बिल्डरकडे ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. पण लोकायुक्तांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडलं.

पोलिसांचं काम कायद्याचं संरक्षण करणं आहे. पण जर तेच पोलीस आपल्या अधिकारांचा गैरवापर करत कायद्याचं उल्लंघन करत असतील, तर काय म्हणायचं? असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने एका बिल्डरकडून तब्बल ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र लोकायुक्त विभागाने सापळा रचून या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं.

आश्चर्य म्हणजे, पकडल्यावर आपली चूक मान्य करण्याऐवजी तो पोलीस अधिकारी जोरजोरात ओरडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी या पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

ही घटना बंगळुरू येथील चामराजपेट CAR ग्राउंड्स परिसरात घडली. गोविंदराजू नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने चिट फंड फसवणूक प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात एका बिल्डरकडे ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र बिल्डरने पैसे देण्याऐवजी थेट लोकायुक्त विभागाकडे तक्रार केली.

तसंच आपले आरोप सिद्ध करण्यासाठी, पोलीस अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेस पुरावा म्हणून सादर केले. प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तत्काळ तपास सुरू केला आणि सापळा रचून पोलिसाला रंगेहात पकडलं.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या कारवाईचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये संबंधित पोलीस अधिकारी आपण निर्दोष असून आपल्याला फसवण्यात येत असल्याचे आरोप करत जोरजोरात आरडाओरडा करताना दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.