टीकेची झोड उठताच भाजपला शहाणपण; आपटेचा घेतला राजीनामा
बदलापूर : खरा पंचनामा
काल भाजपने बदलापूर लैंगिक प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिले होते. मात्र त्यानंतर भाजपवर सर्व बाजूने टीकेची झोड उठली. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर अखेर तुषार आपटे या आरोपीने स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपला त्रास होऊ नये यासाठी त्याने राजीनामा देताना म्हटल्याचे समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांनी त्याचा राजीनामा घेतल्याचे समोर आले आहे.
तुषार आपटे हा बदलापूरप्रकरणात सहआरोपी आहे. भाजपने बदलापूरमध्ये त्याला स्वीकृत नगरसेवक पद दिले होते. त्यानंतर भाजपवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला. अखेर आज सहआरोपी तुषार आपटे यांनी शाळेची बदनामी होऊ नये तसेच भाजपला त्रास होऊ नये असे कारण देत आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार आपटेचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण असळची चर्चा आता सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.