'भाजपचा महापौर पाहिजे, बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नाही!'
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपच्या मोठ्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई महापालिकेतील प्रभाक क्रमांक 47 मध्ये प्रचारासाठी आलेल्या भाजपचे नेते, तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी थेट मुंबई महाराष्ट्राचे शहर नसल्याचे म्हटले.
'केंद्रात नरेंद्र मोदी आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत आणि मुंबई भाजपचाच महापौर पाहिजे. बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही. आंतरराष्ट्रीय शहर आहे.', असे अण्णामलाई यांनी म्हटले.
मुंबईत प्रचारासाठी आलेल्या अण्णामलाई म्हटले, मुंबईचे बजेट 75 हजार कोटीच्या घरात आहे. ही काही लहान रक्कम नाही. चेन्नईचे बजेट आठ हजार कोटी आहे. तर, बंगळुरू या शहराचे बजेट 19 कोटी आहे. त्यामुळे येथे ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे.
अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचे शिलेदार आक्रमक झाले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपचे स्टार प्रचाराक हा कोणी अण्णामलाई आहे तो सांगतोय की मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही. हा विचार भाजचा आहे का? हा भाजचा नेता आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर भाजपने येथे गुन्हा दाखल केला पाहिजे.
राऊत यांनी या एकनाथ शिंदेंना देखील टार्गेट केले. ते म्हणाले, 'धनुष्यबाण घेऊन जे पळाले त्यांचा स्वाभिमानी बाणा कुठंय? शिवसेना म्हणून फिरवतात त्यांच्या तोंडात बोळा बसलाय का कापडाचा? तुमच्या धोबाडात मारून गेलाय तो अण्णामलाई.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.