महाराष्ट्रांच्या लाडक्या नेत्याला जड अंतःकरणाने अखेरचा निरोप
दादा कायम आठवणीत राहणार!
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिंवावर आज बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय मानवंदना देवुन मुलगा पार्थ आणि जय पवार यांनी जड अंतःकरणाने मुखाग्री दिला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमला होता.
अजित पवार यांचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभेसाठी बारामतीकडे येत असताना विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 28 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रांसाठी काळा दिवस ठरला गेला, त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रांवर शोककळा पसरली आहे.
अजित दादा पवार यांना निरोप देण्यासाठी राज्यभरांतून आलेल्या कार्यकर्त्यांना देखील अश्रूं अनावर झाले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य राज्यांतील तसेच महाराष्ट्रांतील दिग्गज नेतेमंडळींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत पार्थिंवावर पुष्पचक्र वाहून जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली. दमदार आवाजाचा आणि रोखठोक बोलणारा महाराष्ट्रांचा नेता आपल्या सर्वांचा लाडका नेता हरपला.
दादांच्या जाण्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. दादांच्या दुर्दैवी निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली मात्र या बातमीवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. बारामतीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारांसाठी अजित दादा पवार यांच्या चार सभांचे बुधवारी बारामतीत आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी ते मुंबईतून बारामतीकडे विमानाने जात होते. यावेळी बारामतीत विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला. याच विमानात अजित दादा पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शुभांगी पाठक अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव प्लाइट अरेडंट पिंकी माळी हे कर्मचारी यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. अजित दादा पवार यांच्या निधनानंतर राज्यांतील तीन दिवसांचा दुखवटा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. सर्वांच्या प्रश्नांवर सडेतर उत्तरे आणि गोरगरिबांचा वाली म्हणून दादांना ओळखले जात होते. दादांचा आवाज म्हणजे सर्वसामान्यांनी गरीब जनतेसाठी महत्त्वाचा मानला जात होता. दादांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रांला मोठा धक्का बसला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.