डोळ्यात अश्रू, तोंडातून शब्द ही फुटेना
शरद पवारांच्या पहिल्या प्रतिक्रियेने सर्वांनाच रडवले
बारामती : खरा पंचनामा
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. पवार कुटुंबासाठी हा सर्वात मोठा आघात आहे. शरद पवारांना ही बातमी समजल्यानंतर ते तातडीने बारामतीकडे आले होते. त्यांनी जिथे अजित पवारांचे पार्थिव ठेवले होते, त्या ठिकाणी भेट ही दिली होती.
त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान इथे ही गेले होते. अजित पवारांचा अपघात की घातपात याची चर्चा ही सुरू झाली होती. त्यांच्या निधनावर कुणाचा ही विश्वास बसत नव्हता. अशा वेळी शरद पवार हे पुढे आले. त्यांनी यावेळी मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार संध्याकाळी माध्यमांसमोर आले. ते दिवसभर काहीच बोलले नाहीत. त्यांच्यासाठी अजित पवारांचा मृत्यू हा मोठा धक्का होता. ज्या वेळी ते माध्यमांसमोर आले त्यावेळी ते पुर्ण पणे खचलेले दिसले. त्यांना सुरूवातील बोलण्यास ही त्रास होत होता. त्यांच्या तोंडून शब्द ही फुटत नव्हेत. डोळ्यात आश्रू होते. आवाज थरथरत होता. त्यावरूनच पवारांसाठी हा किती मोठा धक्का होता हे समजू शकत होतं. प्रत्येक वेळी खंबिर पणे समोरे जाणारे शरद पवार हे पहिल्यांदाच खचल्या सारखे दिसले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.