'... हा धोका मुख्यमंत्र्यांना समजला आहे, पण सांगतील कोणाला?'
'अदानींना आर्थिक मदत कुठून झाली?'
पुणे : खरा पंचनामा
गेल्या 10 वर्षांमध्ये गौतम अदानी या समूहाची झपाट्याने प्रगती झाली. माझा विरोध उद्योजकांना नाही पण फक्त एका उद्योजकाने देशभरात प्रत्येक क्षेत्रात हातपाय पसरवले आहेत, असं म्हणत पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्र्यांवर उत्तर दिलं.
खरं तर मुंबई आणि ठाण्यातील सभेतून राज ठाकरे यांनी गौतम अदानी या समूहाने देशभरात कुठे कुठे आपले उद्योग पसरवला आहे, हे दाखवून दिलं. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले होते की, 'मी अदानींचा वकील नाही. राज ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देतीलच. मात्र, 2014 नंतर देशात फक्त गौतम अदानीच नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा विकास झाला, त्यांचे उत्पन्न कैकपटीने वाढलं.'
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पलटवार केला. राज ठाकरे म्हणाले की, 'हा विषय कुठला एका उद्योगपतीच्या विरोधातील नाही आहे. विषय हा आहे की, इतर उद्योगपती टाटा असेल, अंबानी असेल बिर्ला असेल यांना या प्रगतीपर्यंत पोहोचण्यासाठी 50-60 वर्ष लागली. पण याच्यांही पलीकडे जाऊ गौतम अदानी समूहाला या प्रगतीसाठी केवळ 10 वर्षात मोठा होतो. माझ्या विषय तिथे आहे.'
राज ठाकरे पुढे म्हणाले की, म्हणजे उद्या तुमचं सिमेंटपासून, स्टिलपासून, एअरपोर्टपासून, विजेपासून सगळ्या गोष्टी एकाच माणसाकडे यायला लागते. तेव्हा एखादा माणूस देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सर्व पुरवणारं केंद्र सरकार ज्यावेळी असतं. त्यांना देशात कुठेही जा आणि काही करा, असं रेड कार्पेट असतं. माझा आक्षेप इथे आहे.
इंडिगोचं उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले की, हा एकच माणूस देशाला वेठीस धरू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकतच इंडिगो कंपनी आहे. एका एअरलाइन्सने विमान बंद केल्यानंतर देशाचे कसे हाल होतात, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. हा धोका मुख्यंत्र्यांनी समजून घेणे गरजेचा आहे, किंवा अर्थात समजलं असेल पण आता सांगतील कोणाला? हे उद्योग उभे करण्यासाठी गौतम अदानींना आर्थिक मदत कुठून झाली. कोण कोणत्या बँकांना - संस्थेला मदत करायला लावली. उद्या जर गोष्टींवर संकट आलं तर लोकांच्या नोकऱ्या जातील देश नुकसानात जाईल आणि देश ठप्प होणार.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.