मिरजेतील प्रथमेश ढेरे टोळीवर 'मोका'ची कारवाई
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा कारवाईचा दणका!
कोल्हापूर : खरा पंचनामा
सध्या सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मोका कारवाईचा दणका दिला आहे. मिरजेतील निखिल कलगुटगी याच्या खुनातील संशयित आरोपी प्रथमेश ढेरे याच्यासह त्याच्या टोळीतील 15 जणांवर मोकाची कारवाई करून कोल्हापूर परीक्षेत्रातील गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे.
प्रथमेश सुरेश ढेरे (वय २५, रा. ढेरे गल्ली, मिरज) व टोळी सदस्य विशाल बाजीराव शिरोळे (रा. मंगळवार पेठ, होळी कटटा, मिरज), सर्फराज बाळासो सय्यद (वय २२, रा. ढेरे गल्ली, मिरज) प्रतिक सचिन चव्हाण (वय २०, रा. हनुमान मंदिर शेजारी, दिंडीवेस, मिरज), करण लक्ष्मण बुधनाळे (वय २१, रा. नाटेकर गिरणीजवळ, दुर्गानगर, मिरज), गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी (वय २७, रा. मंगळवार पेठ, वडर गल्ली, चर्चजवळ, मिरज), सुरज चंदू कोरे, (वय २६, रा. ढेरे गल्ली ब्राम्हणपूरी, मिरज), संग्राम राजेश यादव, (वय २६, रा. शिवनेरी चौक, केळकर बोळ, ब्राम्हणपूरी, मिरज), सलीम गौस पठाण (रा. गव्हर्नमेंट कॉलनी, खतीबनगर, मिरज), चेतन सुरेश कलगुटगी (रा. वडर गल्ली, मिरज), सोहेल उर्फ सुहेल जमीर तांबोळी (रा. खणभाग, सांगली), महंमदशिराज उर्फ सोहेल आब्बास आगलावणे (रा. पाटील हौद, मिरज, परागंदा), अक्षय सदाशिव कांबळे (रा. खतीबनगर मिरज), अमन समीर मुल्ला (रा. ब्राम्हणपूरी, ढेरे गल्ली, मिरज, परागंदा), दिप अश्विन देवडा (रा. शनिवार पेठ, मिरज, परागंदा) यांच्यावर 'मोका'ची कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीकडून २०१७ पासुन २०२५ पर्यंत आज अखेर सतत गुन्हयांची मालिका केली आहे. या टोळीने त्यांचे वर्चस्व टिकविण्यासाठी, आर्थिक फायदयासाठी व इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी टोळी प्रमुख म्हणुन संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करुन खुन, खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवणे, खंडणीसाठी अपहरण करणे, दरोडा, गंभीर दुखापत करणे, विनयभंग, विना परवाना अग्नीशस्त्र जवळ बाळगुन खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, टोळीची दहशत रहावी म्हणुन हत्यार जवळ बाळगुन नागरीकांत दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत. ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत आहे. या टोळीने त्यांची दहशत निर्माण केलेली आहे असे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (२), ३(१) (ii), ३ (२), ३ (४), ४ अन्वये वाढीव कलमे लावणेकरीता अभिप्राय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचेकडून प्राप्त करून घेवून सदरचा प्रस्ताव मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचेकडे सादर केला होता. घुगे यांनी सदर प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करुन तो विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचेकडे मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करणेकरीता मंजुरीसाठी मोक्का कलम २३ (१) (अ) अन्वये अहवाल सादर केला होता. त्याला महानिरीक्षक फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, राहूल जाधव, गजानन बिरादार यांनी या कारवाईत भाग घेतला.
गुन्हेगारी टोळ्या कायमच्या नष्ट करणार
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईचा दणका देण्याचा इशारा या कारवाईतून महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी मिरजेतील टोळीवर 'मोका'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवून या टोळ्या कायमच्या नष्ट करण्यात येतील. गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.