दुचाकीवर हेल्मेट न घालणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दोन लाखांचा दंड
बीड : खरा पंचनामा
दुचाकी वाहनचालक आणि मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून हेल्मेटची सक्ती सोमवार (दि.19) पासून सुरू केली. नगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या जवळपास 180 जणांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानुसार 1 लाख 80 हजारांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांनी दिली.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक दुचाकी वाहनचालक आणि मागे बसणाऱ्याला हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. त्यानुसार आवाहन करून जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन करावे असे सांगितले होते. मात्र तरीही सोमवारी शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कामावर येत असताना अनेकांनी नियमांना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार कार्यालयाच्या दारातच उभा असलेल्या वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी करत 180 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार 1 लाख 80 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून वाहतूक शाखेच्या प्रभारी असलेल्या सुभाष सानप यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवायात सर्वाधिक प्रमाण होते ते नगरपालिकेचे. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेमधील देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाया झाल्या. त्यानंतर न्यायालय, तहसील आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.