Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एपीआय मीरा देशमुख निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी

एपीआय मीरा देशमुख निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी

जळगाव : खरा पंचनामा

जळगांव जिल्हा पोलीस दलात मागील दोन दिवसांपूर्वी पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी नुकतेच काढले होते. यामध्ये निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास शिवराम बोचरे यांचाही कार्यकाळ संपल्याने समावेश होता. त्यांची बदली जळगांव अनैतिक मानवी वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. तर निंभोरा पोलीस ठाण्यात त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा कल्पेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी निंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार सोमवारी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी देशमुख यांनी निंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच म्हणाल्या की, मी जिल्ह्यात व या परिसरांत काम केल्याचा निश्चितपणे येथे काम करताना चांगलाच फायदा होईल. तसेच या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रथम न्याय देण्यास व त्यांच्या तक्रारीचे निरसन तसेच गुन्हेगारी नियंत्रणासोबतच कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रथम प्रधान्य आपले असेल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नूतन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे परिसरांतील सर्वसामान्य नागरिकांकडूनही स्वागत करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.