Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्नाचे आमिष दाखवून विवाहित पोलिसाचा महिलेवर अत्याचारपीडित महिलेची एसपीकडे धाव !

लग्नाचे आमिष दाखवून विवाहित पोलिसाचा महिलेवर अत्याचार
पीडित महिलेची एसपीकडे धाव ! 

बीड : खरा पंचनामा

बीड जिल्हा पोलीस दलात एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून पतीपासून विभक्त असणाऱ्या महिलेवर विवाहित असलेल्या पोलिसांने लॉजवर नेवुन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वेळोवेळी आपल्या पदाचा धाक दाखवत आणि मी तुझ्याशीच लग्न करीन,असे म्हणत अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. या घटनेमुळे बीडच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तो पोलीस विवाहित असून त्याने फसवणूक केल्याने पीडित महिलेने थेट बीडच्या एसपीकडे धाव घेवुन आरोपी पोलिसांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

पीडित महिलेचे लग्न झाले होते, पण ती 2022 पासून आपल्या नवर्‍यापासून विभक्त रहात होती. कौटुंबिक वाद आणि कायदेशीर प्रक्रियेत अडकून राहिलेल्या या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा पोलिसाने घेतला. हा पोलीस कर्मचारी  विवाहित असुनही त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्ती लॉजवर नेऊन संबंध प्रस्थापित केले. मी पोलीस आहे माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. त्यामुळे तुला कोर्टांच्या कामात मदत करीन लवकर न्याय मिळवून देईन, तसेच माझे बायकोसोबत पटतं नाही तिला पण लवकरच घटस्फोट देवुन तुझ्यासोबत लग्न करीन, या बोलण्यावर या पीडित महिलेने देखील विश्वास ठेवला होता आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली होती. 

पोलिसाने उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यामुळे पीडित महिलाही गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या सर्व प्रकरणात पोलिसांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या पीडित महिलेने बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत पोलीसाविरोधात तक्रार दाखल करून आपली व्यथा थेट एसपीसमोर मांडली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.