खासदार संजय राऊत अन् एकनाथ शिंदेंची भेट
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मुंबई : खरा पंचनामा
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारामध्ये एकमेकांची उणी-दुणी काढणाऱ्या दोन नेत्यांची भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीमुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले असून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे चर्चा रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भेट झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर हे दोन्ही नेते कोणत्याही राजकीय कटुतेशिवाय एकमेकांशी संवाद साधताना दिसले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिंदे गटाविरोधात झालेली भाजप-काँग्रेसची आघाडी, अकोट नगर परिषदेत झालेली भाजप-एमआयएम युतीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.