अजितदादांच्या राष्ट्रवादीनं उघडलं खातं, मतदानाआधीच उधळला विजयाचा गुलाल
अहिल्यानगर : खरा पंचनामा
भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील राज्यात पहिले खाते उघडले आहे. अहिल्यानगर महापालिकेचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8 ड बिनविरोध निवड झाली आहे.
कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध झाला होता. पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल भाजपचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते. कल्याण डोंबिवली, पनवेल आणि धुळे या महापालिकेत भाजपने खाते उघडले. त्यांनंतर आज अजित पवार गटाने पहिले खाते उघडल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.