Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदानापूर्वीच भाजपची विजयी सलामी! आतापर्यंत 8 उमेदवार बिनविरोध

मतदानापूर्वीच भाजपची विजयी सलामी! 
आतापर्यंत 8 उमेदवार बिनविरोध

मुंबई : खरा पंचनामा

भाजपने महापालिका निवडणुकीत विजयी सलामी देण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरातून भाजपचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला. कल्याण-डोंबिविलीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले असून तिन्ही उमेदवार महिला आहेत. त्यामुळे, भाजपच्या विजयाचे खाते महिलांनी खोलले आहे.

कल्याण-डोंबिवलीनंतर धुळे महापालिकेत 3, पनवेल महापालिकेत 1 आणि आता भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पहिला विजय मिळाला आहे. असे एकूण 8 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. वार्ड क्रमांक १७ (ब) मधून भाजपचे उमेदवार सुमित पाटील यांच्यासमोर असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे सुमित पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे. सुमित पाटील हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र.26-क मधून आसावरीताई केदार नवरे यांची नगरसेविकपदी बिनविरोध निवड झाली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपच्या रंजना मीतेश पेणकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवलीतील 3 प्रभागात 3 महिला उमेदवार बिनविरोध ठरल्या आहेत.

पनवेल महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे. या प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराने दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरवण्यात आल्याने नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काल दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरेखा उगले यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.