'मी मोठ्या काकाचा पुतण्या, तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा'
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे पुणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षाकडून तगडी तयारी सुरु आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राज्यातील नेत्यांनी पुण्यात प्रचाराचा समारोप करण्याचं ठरवलय.
उपमुखमंत्री रोड शो करुन जंग जंग पछाडताना दिसत आहेत. आज देखील अजित पवार रोड शो घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पुण्यात आहेत आणि महत्वाच म्हणजे राज ठाकरेदेखील आज दिवसभर पुण्यात आपल्या उमेदवारांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळ सगळ्याच पक्षाकडून पुण्याकडे जास्त लक्ष असल्याचं दिसून येत आहे. आज अजित पवार अनेक प्रभागांमध्ये सभा घेत आहेत, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी चंदननगरमध्ये भाजपच्या उमेदवारांवरती हल्लाबोल केला आहे, भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावरती टीका केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी आपल्याला सांगतो मी शब्दाचा पक्का आहे. उद्याच्या निवडणूकीत तुम्हाला कोणाला तरी मत द्यायचा आहे. तुम्ही मागे अनेकांना मत दिली आहेत. पूर्वी ते घड्याळावर निवडून आलेले आहेत. तुम्ही सत्ता द्या, या भागातील टँकर माफियाचं नाही कंबरड मोडला ना च्यायला नावाचा अजित पवार सांगणार नाही. अजित पवार यांनी यावेळी नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. गजर कशा करता वाजतो. माणसांना उठवायला एकदा घड्याळाचं बटणं दाबून बघा काय करतो ते, इथले ड्रग्स वैगेरे जे चालेल आहे ते थांबवायचं आहे. मला इथे कळालं की, प्रभाग चार मधील तिकडचे उमेदवार हे टँकर माफिया आहेत. इथे जर कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आम्ही पण काय कच्चे नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलं तर आम्ही पण काय सोडणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, मी आताच सांगतोय. वरिष्ठांना आताच सांगून ठेवतोय. मी जर तिथे गेलो आणि काय चुकीच अढळलं तर थेट कारवाई करणार आहे. आता माऊली कटके आणि अशोक पवार दोघे एकत्र आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. आधी मागे हे दोघे एकमेकांच्या विरोधात लढले होते, आता दोघे एकत्र आले, प्रभाग चार आणि पाचचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, निवडून आलेच पाहिजेच, भाजप उमेदवाराच्या विरोधात अजित पवार यांची माऊली कटके आणि अशोक पवार यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मागे जे झाले ते झालं गंगेला मिळालं, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.