Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुत्रा चावल्यानं मृत्यू किंवा जखमी झाल्यास राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी!

कुत्रा चावल्यानं मृत्यू किंवा जखमी झाल्यास राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी!

नवी दिल्ली : खरा पंचनामा

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने इशारा दिला की जर एखादा कुत्रा चावल्यानं कुणाचा मृत्यू झाला किंवा लहान मुलं, वृद्ध जखमी झाले तर या प्रकरणी नुकसान भरपाई राज्य सरकारला द्यावी लागेल. कारण राज्य सरकारने काही उपाय न केल्यानं हे घडतंय. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले की, जे लोक कुत्र्यांना खायला घालण्याचा दावा करतात त्यांनाही जबाबदार ठरवलं जाईल. तुम्हाला जर इतकंच भटक्या कुत्र्यांबाबत वाटतं तर त्यांना घरी घेऊन जा. कुत्र्यांनी रस्त्यावर का फिरावं, लोकांना चावावं आणि घाबरवावं? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.

वकील मेनका गुरुस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटलं होतं की, भटक्या कुत्र्यांचा मुद्दा भावनिक आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, भावना आतापर्यंत फक्त कुत्र्यासाठीच वाटत आहेत. यावर मेनका गुरुस्वामी यांनी नाही, मला माणसांचीही तेवढीच काळजी वाटते असं सांगितलं.

कुत्रा चावलेल्या एका महिलेनं न्यायालयात तिची बाजू मांडली. महिलेनं म्हटलं की, नसबंदी कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवल्यास कुत्र्यांचा आक्रमकपणा आणि त्यांची संख्या कमी करण्यास मदत होईल यावर मी सहमत आहे. पण मला एक कुत्रा कोणत्याही कारणाशिवाय चावला होता. मला हे जाणून घ्यायचंय की तो कुत्रा मला का चावला. त्याला बराच काळ क्रूर वागणूक दिली गेली असावी. लोकांकडून लाथ मारणं, दगड मारण्याचे प्रकार होतात. या भीतीमुळे त्यानं संरक्षणात्मक आक्रमकपणा दाखवला. त्यातूनच तो मला चावला. कुणीतरी केलेल्या चुकीची शिक्षा मी भोगतेय.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीत म्हटलं होतं की, रस्त्यावरून कुत्रे हटवण्याचे निर्देश दिलेले नाहीत पण नसबंदी करून भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्याचा आदेश होता. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात युक्तिवाद ऐकताना न्यायालयाने असंही म्हटलं की, कुत्रे त्या लोकांजवळ येऊ शकतात जे त्यांना घाबरतात किंवा ज्यांना कुत्र्यांनी चावलं असेल. तशा लोकांवर ते हल्ला करतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.