Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणारी टोळी जेरंबद तीन गुन्हे उघड, ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत : मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणारी टोळी जेरंबद 
तीन गुन्हे उघड, ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत : मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे औषध फवारणीचे ब्लोअर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून 11 लाखांचे तीन ब्लोअर जप्त करण्यात आले आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

नंदकुमार नाभिराज चौगुले (वय ३८, रा. भोसे, ता. मिरज), बसवराज सत्याप्पा हिप्परगी (वय ३०, रा. बेडरट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद यांनी चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक निरीक्षक सुनिल गुरव यांचे पथक त्यांचा शोध घेत होते. पथकाला भोसे येथील चौगुले याने ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करून त्याची विक्री केल्याची माहिती मिळाली.

पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने साथीदार हिप्परगी याच्यासोबत मिळून तीन ट्रॅक्टर ब्लोअर चोरून त्याची विक्री केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून 11 लाखांचे तीन ट्रॅक्टर ब्लोअर जप्त करण्यात आले.

पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनिल गुरव, उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे,  उपनिरीक्षक अझर मुलाणी, प्रविण यादव, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, उदय लवटे, सागर कोरे, सायबर पोलीस ठाण्याचे करण परदेसी, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.