Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक

बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक

बदलापूर : खरा पंचनामा

दोन वर्षांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या घटनेनं संपूर्ण राज्याला धक्का बसला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काऊंटरदेखील करण्यात आला होता.

मात्र, आता याच प्रकरणातील एका सहआरोपीला भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. तुषार आपटे असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

शुक्रवारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत पाच स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर करण्यात आली. यात भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशा सदस्याचा समावेश आहे. यात भाजपने तुषार आपटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरुन आता राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

तुषार आपटे हे बदलापूर लैगिक प्रकरणातील सहआरोपी आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेच्या शैक्षणिक संस्थेत ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. लैगिंक अत्याचाराच्या घटनेनंतर ते अनेक दिवस फरार होते. त्यांना ४४ दिवसांनंतर कर्जत येथून अटक करण्यात आली होती. मात्र, अवघ्या ४८ तासांत त्यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थेत पुन्हा काम सुरु होतं.

महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर ते राजकारणातही सक्रीय होता. ते भाजपासाठी काम करत होते. पालिका निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी प्रचार करत पक्षाला मदत केली होती. त्याचंच फळ म्हणून भाजपाने आता त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमल्याचं बोललं जातं आहे. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.