Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मी मुख्यंत्री असेपर्यंत साहित्यात राजकारण येऊ देणार नाही!

मी मुख्यंत्री असेपर्यंत साहित्यात राजकारण येऊ देणार नाही!

सातारा : खरा पंचनामा

साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन झाले. या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकारण आणू नये किंवा राजकीय भाष्य करू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं की मी मुख्यंत्री असेपर्यंत साहित्यात राजकारण येऊ देणार नाही.

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "साहित्यसंमेलन दिशादर्शक असतं. अध्यक्षीय भाषणातून पुढच्या वर्षीची दिशा मिळते. अशाच प्रकारचं मार्गदर्शन यातून होत राहील. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही. आम्हाला रसही नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्यात राजकारण आणू नये अशी मी विनंती करतो", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आज मला असं वाटतं की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपला मराठीचा अभिमान असाच कायम राहिल. मराठीची सेवा आपण करत राहू. मी निश्चितपणे सांगू इच्छितो की साहित्यिकांचे कार्यच आहे की साहित्याची निर्मिती मनोरंजनाकरता नाहीय, समाजातील जाणिवा विस्तारीत झाल्या पाहिजेत याकरता साहित्याची निर्मिती होत असते. म्हणून कधी टीका झाली, गौरव झाला तरीही त्याचं कोणतंही वाईट वाटून घेण्याऱ्यातले आम्ही नाही. मला असं वाटतं की एखादी टीका झाली, ती योग्य असेल तर त्यातून सुधारण्याचा मार्ग दिसतो. आपल्याला सर्व समजतं अशां मुर्खाच्या नंदनवनात वावरण्यातले आम्ही नक्की नाही. असं कोणी वावरू नये असं समजणारा मी आहे", असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात म्हणाले, "खरं म्हणजे मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही. पण आज मंचावर बसून मोबाईलवर सतत बोलत होतो, याबाबत मी माफी मागतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सगळ्या पक्षांमध्ये एवढी बंडखोरी आहे की त्यांची मनधरणी केल्याशिवाय अर्ज मागे घेत नाहीत. मी कार्यकर्त्यांना विनंती करत होतो की फॉर्म परत घे, त्यामुळे मी  फोनवर बोलत होतो. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. मात्र, मी बहुश्रुत आहे, फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याकडे माझं लक्ष होतं."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.